पुणे जिल्हा परिषद, पुणे
बांधकाम विभाग (उत्तर)
सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी
अ. क्र. | सुशिक्षित बेरोजगार अभियंता अ मजूर सहकारी संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस |
१. | सुशिक्षित बेरोजगार अभियंता अ मजूर सहकारी संस्था यांनी सर्व प्रथम ऑनलाईन फोर्म भरून घेणे |
२. | फोर्म भरल्यानंतर त्यांना युजर नेम आणि पासवर्ड Whats App ला मेसेज येईल |
३. | त्यानंतर त्यांनी log in करून आपली राहिलेली प्रोफइल पूर्ण करून घेणे |
४. | नंतर डॉक्युमेंट मध्ये जाऊन सर्व डॉक्युमेंट उपलोड करून घेणे |
५. | या नंतर तुमचे Application इंचार्ज कडून चेक केले जाईल |
६. | डॉक्युमेंट आणि प्रोफइल चेक करून तुम्हाला तुमच्या Log In मध्ये Status ला तुमचा इंचार्ज चा report कळेल. |
७. | तसेच त्यामध्ये तुम्हाला इंचार्ज कडून एक मेसेज पण दिसेल त्यानुसार पुढील प्रोसेस समजेल. |
८. | जर का तुमचा Status मध्ये Reject असेल तर त्याचे कारण तिथे मेसेज मध्ये दिलेले असेल त्यानुसार बदल आणि अपडेट करून घेणे. |
९. | आणि तुमचा Status मध्ये Approve असेल तर तुम्हाला चलन भरावे लागेल.त्यासाठी मेसेज मध्ये सांगितल्यानुसार चलन साठी इंचार्ज कडे येऊन चलन घेऊन बँकेत भरणे आणि नंतर चलन ची एक SoftCopy लॉग इन करून चलन उपलोड Option मध्ये चलन उपलोड करणे.. |
१०. | त्यानंतर Accountatnt चा Status आणि मेसेज तुमच्या लॉग इन ला दिसून जाईल. |
११. | या नंतर Engineer आणि Admin चा Status अपडेट दिसून जाईल.. |
12. | इंचार्ज अकौंटंट इंजिनिअर आणि Admin या सर्वांचे Status Approve झाल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस होईल. |
१३. | या सर्व प्रोसेस नंतर इंचार्ज कडे तुमच्या Certification ची प्रोसेस केली जाईल.. |
१४. | त्याचे तुम्हाला अपडेट्स दिले जातील आणि नंतर तुमच्या लॉगइन पोर्टल मध्ये Certificate चा Option दिसेल. |
अ. क्र. | Lottery मध्ये भाग घेण्याची प्रोसेस |
१. | ज्यांचे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाली आहे आणि त्यांना Certificate मिळाले आहे असे सु बे अ आणि मजूर सहकारी संस्था Lottery मध्ये सहभाग घेऊ शकता |
२. | Lottery मध्ये भाग घेण्यासाठी अगोदर जिल्हा परिषदेच्या कामवाटप पोर्टल वर तसेच तुमच्या मोबाईल whats app वर मेसेज येईल कामाची यादी उपलोड केलेली. |
३. | त्यानंतर तुम्ही लॉग इन करून तुमच्या तालुक्यातील कामांना इंटरेस्ट दाखऊ शकता.. |
४. | जर का तुमच्याकडे चालू ३ कामे असतील तर तुम्हाला या Lottery मध्ये भाग घेता येणार नाही. |
५. | सर्व प्रथम तुम्हाला तुमची चालूची कामे पूर्ण करावी लागतीलआणि त्याचा Work Report तुमच्या पासबुक मध्ये अपलोड करावे लागतील संबंधित अधिकारी त्याची पडताळणी करूनतुमचे पासबुक status अपडेट करतील. |
६. | एकदा तुम्ही कामामध्ये इंटरेस्ट दाखवला तर त्यामध्ये परत बदल करता येणार नाही. |
७. | जर का एखाद्या कामाला त्या तालुक्यातील कोणाचाही इंटरेस्ट नाही आला तर ते काम जिल्ह्यासाठी ओपेन केले जाईल त्यावेळी कोणत्याही तालुक्यातील व्यक्ती त्या कामाला इंटरेस्ट दाखऊ शकेल. |
८. | Lottery दिवशी Youtube Live च्या माध्यमातून आपण सर्व जन Lottery Draw पाहू शकतो. |
९. | त्याच वेळी कोणते काम कोणाला मिळाले याचे जाहीर आणि Website वर Publish केले जाईल. |
१०. | तसेच प्रत्येकाच्या लॉग इन मध्ये जर काम लागले असेल तर ते दिसेल. |
११. | त्यांनतर जिल्हा परिषद मध्ये पासबुक पडताळणी केल्यानंतर Work Order दिली जाईल. |
अ. क्र. | Limit Extend ची प्रोसेस |
१. | नवीन जी आर नुसार ५ एप्रिल २०२३ पासून प्रति सुबे आणि मजूर सहकारी संस्था याचे प्रति वर्षाचे Limit वाढविण्यात आले आले आहे. |
२. | ज्यांना कोणाला या मध्ये Limit Extend करायचे आहे त्यांनी पोर्टल ला स्वताचे लॉग इन करून Limit Extend च्या फोर्म मध्ये आपले प्रमाणपत्र तसेच Employment कार्ड अपलोड करून सबमिट करावे Incharge कडून तुमचे डॉकूमेंट verify करून Approval दिले जाईल. त्यानंतर तुमच्या लॉग इन पोर्टल मध्ये Limit Extend Challan चा नवीन मेनू दिसेल त्यामध्ये उर्वरित रक्कम चे challan बँकेत भरून त्याची Receipt अपलोड करणे. |
३. | Accountatnt Challan verify करून Approval देतील. |
४. | अश्या पद्धतीने Engineer आणि Admin चे पण Approval दिले जाईल. |
५. | या सर्वांचे Approval/Rejection Status तुम्हाला तुमच्या पहिल्या status Details मध्ये दिसून जाईल. |
६. | या व्यतिरिक्त काही माहिती हवी असल्यास जिल्हा परिषदेशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. |