पुणे जिल्हा परिषद, पुणे

बांधकाम विभाग (उत्तर)

सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

अ. क्र. कागदपत्रांची यादी
१. शासकीय अभियांत्रिकी पदवी / पदविका / AMIE अथवा शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र.
२. शासकीय अभियांत्रिकी पदवी / पदविका / AMIE अथवा शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचे शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक .
३. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे (Domicile) प्रमाणपत्र.
४. कोऱ्या कागदावर स्वतःचे नाव व पत्ता लिहून मध्यभागी फोटो लावून तो साक्षांकित करावा.
५. आधारकार्ड.
६. पॅनकार्ड.
७. मी कुठलीही शासकीय / खाजगी नोकरी करत नसले बाबत रु . १००/- चे स्टॅम्प पेपरवरील नोटराइजड प्रमाणपत्र.
८. संबंधिताकडून मूळ कागदपत्रे दाखवून प्रस्ताव तपासून घ्यावा व चलन प्रत तयार करून पुणे, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा परिषद शाखा, पहिला मजला येथे भरण्यात यावे.
९.
प्रस्ताव सादर करताना खालील क्रम लावूनच प्रस्ताव सादर करावा.

१) नाव, पत्ता, पसिंग वर्ष, व महिना (मराठीमध्ये लिहिणे ) लिहिलेला पेपर.
२) नोंदणी अर्ज- नोंदणी अर्जावर उजव्या कोपऱ्यात स्वतःचे ४ साक्षांकित फोटो स्टेपल करावेत.
३) नाव व पत्ता लिहिलेला व फोटो लावलेला पेपर.
४) पदवी / पदविका प्रमाणपत्र.
५) पदवी / पदविका गुणपत्रक.
६) रहिवासी (Domicile) प्रमाणपत्र.
७) आधारकार्ड.
८) पॅनकार्ड..
९) नोंदणी फी भरलेल्या चलनाची प्रत
१०) प्रतिज्ञापत्रक.
प्रतिज्ञापत्र व चलनाची प्रत सोडून इतर सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत करण्यात यावीत.